शिंदेंचं टेन्शन वाढलं!, दुसऱ्या खासदारानंही सोडली खासदारकी, मोठं कारण समोर…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या आणखी एका नेत्याने राजीनाम्याचं अस्त्र उपसलं आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत गोडसे यांनी मराठा आरक्षणासाठी थेट खासदारकीचाच राजीनामा दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं. पण आता त्यांच्याच पक्षाचे खासदार, नाशिकमधील बडे नेते हेमंत गोडसे यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी विविध जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत सरकारला धारेवर धरलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आता फक्त मराठा बांधव नसून राजकीय नेते सुद्धा आरक्षणासाठी पाठिंबा देत आहेत.

दरम्यान, याआधी देखील शिंदे गटाच्या खासदाराने आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी हा राजीनामा दिला होता. त्यांच्या पाठोपाठ आता हेमंत गोडसे यांनी आपला नंबर लावला आहे, त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देँण्याचं लोण पसरायला सुरुवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या –