आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | बीडसह राज्यभरात मराठा आंदोलकांचा (Maratha) आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी एक पाऊल मागे घेतल्याचं दिसतंय. जरांगेंनी मोठा निर्णय घेतलाय.

मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत तपशील देणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-