बीड | मराठा अंदोलक आरक्षणासाठी जास्तच आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा दिवसेंदिवस जास्तच तीव्र होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांचा (Manoj jarange patil) आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे. मात्र गेल्या दोन दिवसात आंदोलनाला गालबोट लागल्याचं पहायला मिळत आहे. रविवारी मराठवाड्यातील एसटी बसेसवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या. अशातच काल बीडमध्ये आंदोलनाने उग्र रुप धारण केलं.
बीडमध्ये काल आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash solanke ) यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांच्या गाड्यांना आग लावली. तसेच माजलगावच्या नगरपरिषदेच्या मुख्य कार्यलयाला आग लावली. त्यानंतर आंदोलकांनी सायंकाळी बीड शहरामध्ये आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांच्या घराला आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाला आग लावली. रात्री बीड एसटी डेपोतील 72 बसेसची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र माजलगाव आणि बीड शहरामध्ये अशांतता पसरली होती.
बीडमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी रात्री आठ वाजल्यापासून संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. जिल्हा मुख्यालय आणि सर्व तालुका मुख्यालयापांसुन पाच किलोमीटर हद्दीपर्यंत असलेल्या सर्व राष्ट्रीय महामर्गांवर हा आदेश लागू आसणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा संचार बंदीचा आदेश लागू आसणार आहे. आजपासून दोन दिवस इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच परीस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या–
- ‘मराठा…इस नाम का डर होना चाहिए’; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
- मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!
- आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे!
- मनोज जरांगेंना अॅड प्रकाश आंबेडकरांचं पत्र; म्हणाले…
- मराठ्यांनी बीड पेटवलं!, शरद पवारांच्या खास आमदाराच्या घराला लावली आग