मोठी बातमी! आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई | मराठ्यांना सरसकट कुणबी (Kunabi) प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj jarange patil) यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. त्यांचा उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. अशातच राज्य सरकारने (State government) मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.

आज राज्यमंत्री मंंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारने स्विकारला आहे. या बैठकीत मराठवाड्यातील कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

न्या. संदीप शिंदे समितीचा (Sandip shinde commission) आज प्राथमिक अहवाल राज्य सरकारने स्विकारला आहे. या बैठकीत मराठवाड्यातील कुणबी नोंदी आसणाऱ्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार आसल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कुणबी म्हणून नोंद आसणाऱ्या मराठ्यांना, कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. उद्यापासून या निर्णयाच्या कार्यवाहीला सुरूवात होणार आहे. निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने राज्य सरकारला 13 पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने एक कोटी 72 लाख दस्तऐवज तपासले आहेत. त्यावेळी 11 हजार  530 कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आणि कागदपत्रे आढळले, याची सर्व माहिती समितीने प्राथमिक अहवालात सादर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-