आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापलं आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. अशात मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) शिंदे सरकारला शेवटचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. उद्यापर्यत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या पासून पाणी घेणं बंद करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.

सकाळी सरकारला सांगितलं होते की सरसकट निर्णय घ्यावा. ज्यांच्याकडे नोंदी आहे, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र न देता सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली.

महाराष्ट्र शांत आहे. सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही, असा सरकारचा अंदाज आहे. त्याला आम्ही काही करु शकत नाही. तुम्ही जाणूनबुजून मराठ्यांवर अन्याय करतायत. तुम्हाला आणखी अन्याय करायचा आहे. पण आता आम्ही सहन करु शकत नाहीत. तुम्ही उद्यापर्यंत विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देवून ओबीसीमध्ये सहभागी करुन घेतलं नाही तर उद्यापासून पाणी पिणं होईल, याची सरकारने नोंद घ्यावी, असं मनोज जरांगे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-