“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

जालना | मराठा आंदोलनाचं वादळ सध्या अवघ्या महाराष्ट्रात फिरत आहे. त्यात मराठा समाज आक्रमक होऊन राजकीय नेते मंडळींच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ करत आहेत. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी देखील आमरण उपोषण सुरु केलं आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

मराठा बांधव आपल्या समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी कसला विचार न करता टोकाची पाऊलं उचलत आहेत. यासोबतच जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं तरी देखील सरकार यावर ठोस निर्णय घेत नाहीये. म्हणून मराठा समाज आक्रमक होत बीड येथे काही राजकीय नेत्यांच्या घरावर त्यांनी हल्ला केला.

बीड येथील नेत्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले, बीडमध्ये लहान मुलांवर गुन्हे दाखल केले तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल.

उद्यापासून पाणी देखील बंद करण्यात येईल, त्यामुळे आता पुढची जबाबदारी सरकारची असेल. आम्हाला अर्धवट निर्णय मान्यच नसल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं. गेले काही दिवस जरांगे यांनी अन्न पाण्याला हात देखील लावला नव्हता. दरम्यान मराठा बांधवांनी खूप आग्रह केला त्यामुळे जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेतलं.

थोडक्यात बातम्या-