“त्या लोकांना सोडणार नाही!”, देवेंद्र फडणवीसांनी दिला सज्जड इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलनाने राज्यात चांगलाच पेट घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन केल्यानंतरही काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत.

दरम्यान, सोमवारी मराठवाड्यात मराठा आंदोलनानं चांगलंच पेटलं होतं. राजकारण्यांची घरं तसेच कार्यालयं जाळण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी सरकारी कार्यालयं देखील जाळण्यात आली. बीडमध्ये आमदारांची घरं-कार्यालयं पेटवण्यात आली. याची दखल थेट गृहमंत्रालयानं घेतली आहे. उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरं जाळली. काही समाजाच्या लोकांना टार्गेट करण्यात आलं. काही प्रतिष्ठित लोकांची हॉटेल्स तसेच दवाखाने जाळण्यात आले. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि गृहखात्यानं या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे लोक घरात असताना घरं जळण्याचा प्रयत्न झाला आहे. गृहखात्याकडे सगळे व्हिडीओ आहेत. एकूण 55 ते 55 लोकांची ओळख पटली आहे. उर्वरित लोकांची देखील ओळख पटवली जाईल. या प्रकरणात 307 अंतर्गत (जीवे मारण्याचा प्रयत्न) कारवाई केली जाईल. अशा प्रकारे प्रयत्न होत असतील तर पोलीस अजिबात बघ्याची भूमिका घेणार नाहीत. त्या लोकांना गृहखातं सोडणार नाही, असा सज्जड इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-