“असं कुठं आरक्षण मिळतं का?”, मराठा आरक्षणाविरोधात ‘या’ अभिनेत्रीची थेट पोस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून साखळी उपोषण करण्यात येत आहे. यात अभिनेत्री अश्विनी महांगडे, रितेश देशमुखने देखील एक ट्विट करत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून समर्थन दाखवलं. तर दुसरीकडे उपोषणाला विरोधही होताना दिसत आहे. अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर एक एसटी फोडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??! इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला UniformCivilLaw, तसेच UniformCriminalLaw ची गरज आहे, असं केतकी चितळेनं म्हटलंय.

सामान्य जनतेची एस टी फोडून कुणाचं नुकसान होते याचा विचार करा जरा. तोड फोड करायची असेल तर ज्यांच्या हक्कासाठी लढताय, त्यांचंच नुकसान का करताय? तो दगड काच फोडून चालकाला लागला असता तर?, असं तिचं म्हणणं आहे. पण असे केल्याने तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का बुवा?, असं केतकीने पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-