ललित पाटील प्रकरणात नवा ट्विस्ट; पुणे पोलिसांवरील आरोपांनी खळबळ

मुंबई |  ललित पाटीलच्या (Lalit Patil) अटकेनंतर ड्रग्स संदर्भात नवनवे खुलासे बाहेर येत आहेत. ललित पाटीलसोबत ड्रग्स प्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललित पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी बंगळूरु येथे बेड्या ठोकल्या.

ललित पाटीलबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात अडकला आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे, न्यायालयाने पुणे पोलिसांना यासंदर्भात परवानगी दिली आहे. त्यानंतर आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेतलं आहे.  

पुढील तपास करण्यासाठी ललित पाटीलला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ललित पाटीलच्या प्रकरणानंतर पुणे पालिसांनी त्याच्या संपर्कात असलेल्यांना अटक केली आहे. ललितला या ड्रग्स प्रकरणात कोण मदत करत होतं? याचा तपास आता पुणे पोलिस करणार आहे. दरम्यान, आता ललितनेच पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहेत.

ललितने पुणे पोलिसांवर काय आरोप केले?

पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यांनी मला आधी मारहाण केली होती. पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे, असं तो न्यायालयात बोलला होता. तरी देखील न्यायालयाने त्याचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे. 

दरम्यान, पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोप ललित पाटीलने आता नवी चर्चा सुरु झाली आहे. ललितचा एन्काऊंट होणार असल्याचा आरोप याआधी अनेक नेत्यांनी केला आहे, त्यामुळे ललित पाटीलला देखील स्वतःच्या एन्काऊंटरची भीती सतावू लागली आहे का?, अशी चर्चा आता रंगली आहे.

थोडक्यात बातम्या-