‘या’ कारणामुळे पंगाक्वीन कंगनाची झोप उडाली, लोकांना केली ही विनंती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कंगना राणौतचा (Kangana ranaut) नवा चित्रपट तेजस 27 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ना चांगला प्रतिसाद मिळाला ना चित्रपटाने चांगली कमाई केली. ‘तेजस’ने (Tejas) पहिल्याच दिवशी देशभरात केवळ 1.25 कोटींची कमाई केली. अशात कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत लोकांना हा चित्रपट पाहण्याचं आव्हान केलं आहे. प्रेक्षकांना केलेली ही विनंती कंगनाला चांगलीच महागात पडली आहे. या व्हिडीओमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

नमस्कार मित्रांनो. काल आमचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे ते खूप कौतुक करत आहेत. पण मित्रांनो, कोविडनंतर आपली हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे सावरलेली नाही. प्रेक्षक 99 टक्के चित्रपटांना संधीसुद्धा देत ​​नाहीत. मला माहित आहे की या आधुनिक युगात प्रत्येकाकडे स्वतःचा मोबाईल फोन आहे. घरात टीव्ही आहे. सुरुवातीपासूनच थिएटर हा आपल्या सभ्यतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर, माझी मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की, जर तुम्ही याआधी ‘उरी’, ‘मेरी कॉम’ आणि ‘नीरजा’ सारख्या चित्रपटांचा आस्वाद घेतला असेल तर तुम्हाला ‘तेजस’ देखील खूप आवडेल. हा चित्रपट नक्की बघा, असं कंगना व्हिडीओत म्हणाली.

कंगनाचा ‘तेजस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. ‘तेजस’ या सिनेमाला ‘लियो’,’12 वीं फेल’,’गणपत’,’फुकरे 3′ आणि ‘मिशन रानीगंज’ या सिनेमांचा सामना करावा लागत आहे. तेजस सिनेमा पाहायला सिनेमागृहात जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. रिलीजच्या पाचव्या दिवसाची कमाई ऐकून पंगाक्वीन कंगनाची झोप नक्कीच उडणार आहे.

दरम्यान, ‘तेजस’ या सिनेमात कंगनाने तेजस गिल या वैमानिकांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं मात्र कौतुक होत आहे. योगी आदित्यनाथ यांनीदेखील कंगनाच्या तेजसचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. त्यावेळी तेजस सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा

राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!