मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई | मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा जास्तच तीव्र झाला आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील आमदार आणि खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामे  दिले. काल हिंगोलीचे खासदार हेमंत (Hemant patil) पाटील यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदनासमोर उपोषण केलं. अशातच मराठा आरक्षणासाठी राज्यातील आमदारही आक्रमक झाले आहेत. या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणासाठी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सकाळी काही आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळं ठोकलं. मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष आधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी केली. जो पर्यंत विशेष आधिवेशन बोलावलं जात नाही, तोपर्यंत कोणत्याच मंत्र्यांना मंत्रालयात प्रवेश करु देणार नाही, अशी भूमिका या आमदारांनी घेतली. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

 कोणते आमदार आंदोलनात सहभागी झाले होते ? 

मराठा आरक्षणासाठी आमदारांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला. आंदोलनात सत्ताधारी पक्षांचे आमदारही उपस्थित होते. यशवंत माने, आमदार निलेश लंके ( Nilesh lanke), बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे, राजू नवघरे, अमोल मिटकरी, (Amol mitkari)  राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, (Chetan tupe ) यशवंत माने आणि बाळासाहेब आजबे हे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही आंदोलन पुकारलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya sule) या देखील आंदोलनासाठी हजर आहेत. त्यामुळे सरकार विधानसभेचे विशेष आधिवेशन बोलणार? का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली

पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?