पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस (Maratha reservation) जास्तच पेटत चालला आहे. राज्यात विविध मार्गांनी आंदोलनं चालू आहेत. आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलक जास्तच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलन शांततेत चालू असतानाच, आंदोलनाला गालबोट लागल्याचं पहायला मिळत आहे.

पुण्याच्या नवले पुलावर मराठा आंदोलकांनी काल टायर जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावर आंदोलकांनी टायर जाळत रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा खेड-शिवापूरपर्यंत लागल्या होत्या.  वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

नवले पुलावर जाळपोळ प्रकरणात 400 ते 500 आंदोलकांवर कारवाई करणयात आली आहे. यामध्ये रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु करुन आज आठ दिवस झाले. दरम्यान, त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यातील तरुणांपासून राजकीय नेते देखील आंदोलनात सामील आहेत. शिवाय सरकार याबाबत कोणताही निर्णय घेत नाही म्हणून काही भागात मराठा समाज आक्रमक होत आहेत. मात्र जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-