छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांना पोलिसांचा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

छत्रपती संभाजीनगर | राज्यात  मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation) लढ्याने जास्तच पेट धरला आहे. आरक्षणासाठी आंदोलक आधिकच आक्रमक झाले आहेत. शांततेत चालू असणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. बीडमध्ये जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक झाली. आमदारांची घरे, सरकारी कार्यालये, हॉटेल अशा विविध ठिकाणी जाळपोळ  केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे  गृहविभाग ( Home deparment ) सतर्क झालं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

मनोज जरांगे पाटलांनीही (Manoj jarange patil ) आंदोलन शांततेत करण्याचं अवाहन केलं होतं. मात्र तरीही आंदोलनाला गालबोट लागलं. प्रामुख्याने मराठवाड्यातील काही जिल्हांमध्ये आंदोलनाला गालबोट लागले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांर कारवाई केली आहे. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हात आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. फुलंब्री पोलीस (Fulambri police) ठाण्यात 8, वैजापूर पोलीस ( Vaijapur police )  ठाण्यात 16 आणि पाचोड पोलिसांत ( Pachod police)  8 अशा एकुण 32  आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विविध प्रकरणात त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं चालू आहेत. मराठवाड्यात तीव्र स्वरुपाचं आंदोलन सुरु आहे. काही जिल्हात आंदोलनाला हिसंक वळण लागलं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा प्रशासनाने  ग्रामिण भागात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

दरम्यान, बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरण सरकारने गांभीर्याने घेतलं आहे. त्यानंतर सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. आंदोलनाच्या आड येऊन हिसांचार करणाऱ्यावर पोलिस  कठोर कारवाई करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा

राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!