“फडणवीसांची ती गोष्ट मराठ्यांच्या हातात”; जरांगे पाटलांचा थेट इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जालन्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यावरून मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाण साधला. जरांगेंनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. जरांगेंनी पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत.

उपमुख्यमंत्री जाणुनबुजून इंटरनेट बंद करत आहेत. त्यामुळे लोकांचा रोष वाढत आहे. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव असू शकतो, असे लोकांना वाटत आहे. हा गंभीर आरोप वाटत असेल, पण मी हे थेट सांगत आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भीत नाही. तुमचं करिअर बरबाद करायचं की चांगलं, हे मराठ्यांच्या हातात आहे, असा इशारा जरांगेंनी दिलाय.

बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांना मारहाण करुन आणि अन्य आंदोलकांवर 307 चा गुन्हा दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निवांत झोप आली असेल, अशी टीका जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

दरम्यान, त्यांच्यामुळेच भाजप संपायला लागली आहे. गोरगरीबाच्या कार्यकर्त्याला मार बसवतो आणि स्वत:ला उच्च नेता म्हणवतो. आता तुला समजेल की, तू उच्च नेता आहे की, मतदानाच्या चिठ्ठ्या वाटण्याच्या लायकीचा आहे, असा घणाघात जरांगेंनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

नागडं झाल्यावर काम मिळतं का? विचारणाऱ्याला अभिनेत्रीचं जोरदार उत्तर

‘या’ कारणामुळे पंगाक्वीन कंगनाची झोप उडाली, लोकांना केली ही विनंती

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?