“माझ्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई करू नका”; ‘या’ आमदाराची विनंती!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणासाठी गेले दोन महाराष्ट्रात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुुरु आहे. वारंवार सरकारला सांगून देखील यावर आणखी कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होऊन त्यांनी अनेक राजकीय नेते मंडळींच्या घरांवर दगडफेक करत जाळपोळ केली आहे.

एकीकडे मराठवाड्यातील राजकीय नेत्यांच्या घरावर हल्ला होत असताना दुसरीकडे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील आमदार निवासात मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाली. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.

तोडफोडीनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज माझ्या गाडीची तोडफोड झाली. या प्रकरणी कारवाई करू नये, असं मी गृहखात्याला सांगणार आहे. मराठा आंदोलनाला नेतृत्व दिसत नाही. या तरूणांना समजावून सांगावं. आंदोलन कसं असावं हे सांगावं, असं नेतृत्व नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

महाराष्ट्रात जाळपोळ सुरु आहे त्यामुळे या घटना कोण घडून आणत आहे?, याकडे लक्ष दिलं पाहिजे. एकमेकांचे स्थानिक विरोधक असतात. ते टार्गेट करून  अशा घटना घडवून आणत आहेत की काय? कारण आमदार स्वत:ची घरं जाळतील, गाड्या जाळतील असं होईल का?, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा

राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!