‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना इशारा दिला आहे. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत नितेश राणेंनी तर जरांगेंना नेमकं कोण हे लिहून देत आहे? असा सवाल उपस्थित केला.

नितेश राणेंनी मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे असा सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना बुधवारी सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जरांगे पाटलांनी कठोर शब्दांमध्ये नितेश राणेंवर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांनी राणेंनी काही बोलू नये असं म्हणत उत्तर आज सकाळी पत्रकारांशी बोलताना दिलं. यावरुन आता नितेश राणेंनी मनोज जरांगेंना थेट इशाराच दिला आहे.

माझी किती किंमत आहे ना हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माहिती आहे. तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय बोलायचं बंद करा. तसेच तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर फडणवीसांवर आणि राजकीय बोलायचं थोडं बंद करा, असा सल्ला राणेंनी जरांगेंना दिलाय.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगेनी मंगळवारी केलेल्या टीकेनंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगेनी आंदोलनाच्या आडून राजकीय वक्तव्य करु नयेत, असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली

पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला