मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. तसेच दुसरीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच सर्वपक्षीय बैठकीनंतर आम्हाला सरकारने वेळ द्यावा आणि जरांगेंनी उपोषण सोडावं, अशी विनंती केली आहे. आता यावर संभाजी भिडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्यासारखे आत एक बाहेर एक बोलणारे राजकारणी लोक आता लांब ठेवले पाहिजेत. जरांगे पाटील (Jarange Patil) हे मनामध्ये वेगळा हेतू ठेवून काही करत नाहीत, असंही भिडे यांनी स्पष्ट केलं. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी माणसे आहेत. ही माणसे कधीही लबाडी करणार नाहीत, असा विश्वासही भिडेंनी व्यक्त केला.
मराठा समाजाचे आंदोलन चिघळताच कामा नये. उद्या सूर्योदय होणार हे मनाेज जरांगे पाटील यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मराठा समाजाचे नेतृत्व आता जरांगे पाटील यांच्याकडेच राहिले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा
‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण
मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली
पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती