‘ती एक’ चूक भोवली; आमदार पितापुत्रांच्या अडचणी वाढल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पंढरपूर | मराठा आंदोलनात अजित पवार (Ajit Pawar) गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे वादात अडकले आहेत. त्यांचे पुत्र रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांनी केलेल्या कथीत वक्तव्यावर वाद सुरु झाला असून त्याविरोधात मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे.

पंढरपूर येथील जरांगे यांच्या सभेला 50 हजार रुपये आपण दिल्याचे कथित वक्तव्यावर हा नवा वाद सुरु झाल्यानंतर काल इसबावी येथे झालेल्या ठिय्या आंदोलनात शिंदे पितापुत्राचा निषेध करण्यात आला. जरांगे यांच्या सभेला खर्च केलेले 50 हजार रुपये व्याजासह मराठा महिलांनी गोळा करून परत पाठवायला सुरुवात केली आहे.

आमदार बबनदादा शिंदे हे पहिल्यापासून वादात अडकत गेले होते. अजित पवार यांना नो एन्ट्री करण्याची भूमिका मराठा समाजाने घेऊनही अजित पवार या पिंपळनेर येथील मोळी टाकायच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी चार नेत्यांनी मराठा समाजाचा ठेका घेतला आहे का असं वक्तव्य केलं होतं.

यानंतर गावोगावी आमदार शिंदे यांच्याविरोधात मराठा समाजाने आंदोलने सुरु केल्यावर दोन दिवसापूर्वी आमदार शिंदे यांनी सोलापूर येथे जाऊन मराठा आंदोलनस्थळी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र मुलाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे मराठा आंदोलक पुन्हा पेटले.

आमच्या मराठा समाजाला अशा पैशाची मस्ती आलेल्या शिंदे कुटुंबाचा पैसे नको असून आता त्यांना व्याजासकट म्हणजे 55 हजार रुपये  परत दिले जातील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आता एकदा माफी मागितल्यानंतर पुन्हा मुलाच्या कथित वक्तव्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत .

आमदार शिंदे यांच्या कुटुंबाकडे कुणबी प्रमाणपत्र असून त्यांचा एक मुलगा ओबीसी जागेवर याच प्रमाणपत्रावर निवडून आला आहे. त्यामुळे स्वतः कुणबीचे दाखले मिळवून समाजाला दाखले मिळताना विरोध करायचे काम आमदार बबनदादा शिंदे करीत असल्याचा आरोप मराठा समन्वयक किरणराज घाडगे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ बड्या अभिनेत्रीमुळे योगी आदित्यनाथ अक्षरशः रडले!

‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली