मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणासाठी राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी “जोवर सरकार यावर निर्णय घेत नाही तोवर मी उपोषण थांबवणार नाही असा शब्द दिला आहे”.

माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पाडली. दरम्यान जरांगे पाटील यांना सरकार पत्र देखील पाठवणार आहे. काय लिहिलेलं आहे त्या पत्रात?

सरकारने जरांगेेंना का पत्र लिहिलं?

1) काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा ठराव मनोज जरांगे यांना दिला जाणार

2) मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ वाढवून मागितला जाणार.

3) अंतरवली सराटीत जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा कृती कार्यक्रम दिला जाणार.

4) मनोज जरांगे यांच्या सभेदरम्यान 441 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळणार.

5) ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करणे.

6) मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार.

7) मराठा समाजाला तातडीने मागास ठरविण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार.

या सर्व मुद्द्यांसह आणखी 4 मुद्दे पत्रात असतील.

सर्वपक्षीय बैठकीत आम्हाला थोडा वेळ द्या, असं सरकारने सांगितलं. दरम्यान, जरांगेंनी पलटवार करत जाब विचारला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला अजून किती वेळ लागेल? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? असे सवाल देखील केले.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल

मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!

आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे!

मनोज जरांगेंना अॅड प्रकाश आंबेडकरांचं पत्र; म्हणाले…

मराठ्यांनी बीड पेटवलं!, शरद पवारांच्या खास आमदाराच्या घराला लावली आग