आधी अजित पवारांच्या कार्यक्रमाला मराठ्यांचा विरोध, आता आंदोलन मागे!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा अधिकच तीव्र झाला आहे. मनोज जरांगे पाटलांचा (Manoj Jarange patil) उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. आंदोलक विविध मार्गांनी आंदोलन करत आहेत. अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारला जात आहे. त्यासोबत राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आली आहे, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाबतीत मराठा आंदोलकांनी एक वेगळाच निर्णय घेतला आहे.

नेमका काय निर्णय घेतला आहे?

आज अजित पवार यांच्या हस्ते ‘दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड’ (Daund sugar private limited) या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. त्यासाठी अजित पवार स्वतः दौंडमध्ये येणार होते. मात्र त्यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता.

अजित पवार यांना दौंडमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. परंतू अजित पवार आजारी असल्याने मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरोधातील आंदोलन रद्द केले आहे. अजित पवार या कार्यक्रमाला येणार नसल्याची माहिती आहे, त्यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे, मात्र मराठा समाजाने आपले आंदोलन मागे घेतले आहे.

दरम्यान, बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegoan Cooperative sugar factory) गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार होता. मात्र त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाने त्यांना विराेध केला, मराठा समाजाचा रोष लक्षात घेता अजित पवार यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलं होतं. 

अजित पवार चार पाच दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार चालू आहे. त्यामुळे त्यांचे  नियोजित दौरे रद्द आहेत. प्रकृती ठीक नसल्याने त्यांना राज्य मंत्रिमंडाच्या बैठकीला हजर राहता आले नाही. कालच्या सर्वपक्षीय बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. जर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!

मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल

मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!

आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे!

मनोज जरांगेंना अॅड प्रकाश आंबेडकरांचं पत्र; म्हणाले…