मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मुंबई | दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा विषय तापत चालला आहे. मनोज जरांगे त्यांच्या उपोषणावर ठाम असून सरकारने अद्यार यावर कोणताही तोडगा काढला नाही. जरांगे वारंवार सरकारला इशारा देत आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत. अशात नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप तसेच नेत्यांकडून प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं आहे.

अमोल मिटकरींच्या वक्तव्याने नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मराठा समाजात सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं. मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन अमोल मिटकरींनी केलंय.

ओबीसीमध्ये असलेल्या मराठा कुणबी समाजानं मोठं मन करावं, असं अमोल मिटकरी म्हणालेत. अशातच अमोल मिटकरींच्या या नव्या भूमिकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठा आंदोलक आक्रमक

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नामुळे महाराष्ट्र वातावरण पेटलेल आहे. मागील नऊ-दहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग अजूनही कमी होण्यास तयार नाही. सरकार वेळ वाढवून मागत आहे तर आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

कुठं अन्न पाण्याशिवाय सुरु असलेलं आमरण उपोषण, कुठं रास्ता रोको तर कुठं जाळपोळ सुरू आहे. मागच्या जवळपास दहा दिवसापासून सुरु असलेल्या मराठा आंदोलनाची धग अजूनही कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!

मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल