दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

मुंबई | ICC वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताची लढत श्रीलंकेविरुद्ध सुरू आहे. मुंबई वानखेडे मैदानावर हा सामना पार पडतोय. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी केली. मात्र पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूनर भारताला मोठा झटका बसला आहे.

श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने पहिली ओव्हर टाकली. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने खणखणीत चौकार मारला. रोहित शर्माच्या या धमाकेदार सुरुवातीनंतर वानखेडेवरील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला, नेहमीप्रमाणे या सामन्यात रोहित जोरदार खेळी करण्याची आशा सर्वांच्या मनात तयार झाली होती, मात्र मोठा घात झाला.

पहिल्या चेंडून चौकार मारल्याचा आनंद भारतीयांसाठी फक्त काही क्षणांचा ठरला. दुसऱ्याच चेंडूवर दिलशानने रोहित शर्माला थेट बोल्ड केलं. भारताने आपल्या कर्णधाराची आणि एका स्फोटक बॅट्समनची मोठी विकेट गमावली होती. चौकार मारल्यानंतर सुरु झालेला जल्लोष क्षणात शांत झाला. मैदानावरील हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

वर्ल्डकपमधील पहिल्या सहा सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच वगळता सर्वच सामन्यांमध्ये रोहितने कमाल कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. मात्र घरच्या मैदानावर रोहित शर्मानं मोठी खेळी करण्यासाठी चाहत्यांना आता आणखी वाट पाहावी लागणार आहे.

घरच्या मैदावर पुन्हा अपयश???

आपल्या घरच्या मैदानावर मोठी खेळी करण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, मात्र रोहितचं हे स्वप्न काही पूर्ण झालेलं नाही. त्याच्या पदरी नेहमी अपयशच आलं आहे. घरच्या मैदानावर या लढतीआधी ३ वनडे मॅच त्याने खेळल्या होत्या. त्यात त्याने १६, २० आणि १० अशा मिळून फक्त ४६ धावा त्याला करता आल्या आहेत. आजच्या लढतीत देखील तो फक्त ४ धावांवर बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!

मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल