“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारत आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्डकपचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. याआधी झालेल्या सहा सामन्यांमध्ये भारतीय संघ अजिंक्य आहे. आता भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होत असताना भारतीय चाहत्यांना आणखी एका विजयाच्या आशा लागल्या आहेत.

श्रीलंकेचा पराभव केल्यास भारतीय संघ सलग सात सामन्यांमध्ये विजय मिळवेल, तसेच आतापर्यंत वर्ल्डकपमधील अजिंक्य संघांपैकी एक एकमेव संघ असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या विजयाने भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश होईल. त्यामुळे भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

भारताचा कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे तसेच भारतीय संघाने सलग सहा विजय मिळवल्याने रोहित शर्माचं सगळीकडूनच चांगलं कौतुक होताना दिसत आहे. रोहित शर्माला देखील कौतुकाची जाणीव आहे, मात्र यावर बोलताना त्याने अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली.  “कर्णधार म्हणून होत असलेल्या कौतुकाबद्दल मी फार विचार करत नाही. सामना सुरू असताना परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करतो, धावफलक बघतो आणि योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

अनेकदा तुमचे निर्णय योग्य ठरतात, त्याचे परिणाम दिसतात, मात्र त्याच बरोबर अनेकदा तुमचे निर्णय चुकतात सुद्धा… तर त्यासाठी तुम्हाला तयार राहायला हवं, असं रोहित शर्मा म्हणाला. आम्ही जे निर्णय घेतो, ते संघाच्या हितासाठी घेतो, हे आम्हाला माहीत असतं. एका सामन्यात खराब कामगिरी झाल्यास मी वाईट कर्णधार असेन, सगळेजण मला वाईट म्हणतील, याची मला पूर्ण कल्पना आहे, असं परखड मत त्याने मांडलं.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आंदोलनाचा धसका?, भारत-श्रीलंका सामन्यात ‘या’ गोष्टीवर बंदी!

बीडमधील जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!

मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल