मराठा आंदोलनाचा धसका?, भारत-श्रीलंका सामन्यात ‘या’ गोष्टीवर बंदी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्यात सध्या मराठा आंदोलनाने पेट घेतला आहे. आंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे, राज्याच्या विविध भागात देखील मोठ्या प्रमाणात बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. मात्र काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या, यानंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

मराठा आंदोलनाचा परिणाम आता वर्ल्डकपच्या सामन्यांवरही होताना दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे, मात्र या सामन्यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

पोलिसांनी नेमका काय निर्णय घेतला आहे?

क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान बॅनरबाजी केलेली आपण नेहमी पाहिली आहे. चाहते आपल्या क्रिकेटप्रेमींची नावं किंवा काही घोषवाक्य लिहून याचं प्रदर्शन करतात दिसतात. क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान कधीकधी राजकीय स्वरुपाची बॅनरबाजी झालेली अनेकदा दिसून आली आहे.

यावेळी वानखेडे स्टेडियमध्ये होत असलेल्या या सामन्यात पोलिसांनी इतर सूचनांसोबत एक सूचना केली आहे. ही सूचना अत्यंत लक्ष्यवेधी आहे. कारण आक्षेपार्ह बॅनर, झेंडे आणि पत्रकं आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणामुळे राज्यातील वातावण तंग आहे. त्यापार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आक्षेपार्ह बॅनर्सवर बंदी घातल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सूचना देताना पोलिसांनी कुठेही मराठा आरक्षण आंदोलनामुळे असं करत असल्याचा उल्लेख केलेला नाही.

थोडक्यात बातम्या-

बीडमधील जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!

मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल

मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!