‘हे सगळं प्लॅनिंग…’; आमदार प्रकाश सोळंकेंचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Ajit Pawar Group MLA Prakash Solanke) यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली होती. तसेच सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या होत्या. यावर सर्व प्रकरावर आमदार प्रकाश सोळंके यांनी भाष्य केलं आहे. सोळंके यांनी खळबळजनक दावा केला आहे. सोळंके यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केलाय.

बीडची घटना म्हणजे गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते, असा खळबळजनक दावा प्रकाश सोळंके यांनी केला.

सोळंकेंनी सांगितलं त्या दिवशी काय काय घडलं?

30 ऑक्टोबरला मी घरातच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते त्यावेळी 5 हजार तरुण आले होते. साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणारं आहे अशी माहिती दिली. मी तरिदेखील तिथच थांबलो. मी त्यांच्याशी बातचीत करावी यासाठी मी थांबलो, असं सोळंकेंनी सांगितलं.

माझं एवढंच मत आहे की 300 लोकं हे अवैध धंदा करणारे, काळाबाजार करणारे आणि माझे विरोधक होते.मी पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज दिले आहेत. मी पोलिसांकडे मागणी केली आहे की केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई नको, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!