मुंबई |आक्रमक मराठा आंदोलकांनी दोन दिवसापूर्वी म्हणजेच 30 ऑक्टोबरला बीडमधील (Beed) माजलगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या होत्या.
आंदोलकांकडून आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक सुरू होती. आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचं पाहायला मिळत होते. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके घरातच उपस्थित होते. याप्रकरणी सोळंकेंनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केलाय.
बीडची घटना म्हणजे गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नेमकं काय घडलं?
30 ऑक्टोबरला मी घरातच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते त्यावेळी 5 हजार तरुण आले होते. साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणारं आहे अशी माहिती दिली. मी तरिदेखील तिथच थांबलो, असं त्यांनी सांगितलं.
जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते, असा खळबळजनक दावा प्रकाश सोळंके यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता
दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!
“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी