Android फोन वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; होणार ‘हा मोठा’ बदल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | Google Chrome हे सर्वाधिक लोकप्रिय वेब ब्राउजर असून, याच्या मदतीने कोणतीही माहिती सहज सर्च करणं शक्य होतं. पण आता जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये क्रोम वापरता येणार नाहीये.

अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अँड्रॉइड यूजर्स जुन्या व्हर्जनवर चालणारे स्मार्टफोन वापरत असतील तर त्यांना त्यांचा फोन बदलावा लागणार आहे.

Google Chrome होणार अपडेट

Android 7.0 आणि Android 7.1 वर आधारित चालणाऱ्या फोनमध्ये यापुढे आता Google Chrome वापरता येणार नाहीये. हा बदल Google Chrome 120 रिलीझ झाल्यानंतर लागू होईल, जो 6 डिसेंबर रोजी स्थिर रिलीझ चॅनेलला हिट करेल आणि Chrome ची नवीन आवृत्ती असेल.

नव्या अपडेटसह क्रोम ब्राउझरमध्ये बरेच बदल केले जाणार आहेत आणि त्यात अनेक अपग्रेड होणार आहेत. काही वेबसाईट सध्या लोड करण्यात समस्या येत आहे त्या अधिक चांगल्या प्रकारे लोड होतील.

Android 7.0 किंवा Android 7.1 सह वापरले जाणारे स्मार्टफोन आणि उपकरणे खूप कमी आहेत. एकूण युजर्सपैकी केवळ 2.6% असे युजर आहेत जे हा स्मार्टफोन वापरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी