भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

वर्धा | लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने खूप आधीच निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. भाजपने महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकू असा संकल्प केलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्प यात्रा काढली आहे. मात्र या यात्रेत भाजप नेत्यांची चांगलीच फजिती होत असल्याचं पाहायला मिळतंय.

भाजपच्या संकल्प यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला. एका प्रश्नावर महिला चांगलीच संतापल्याने बावनकुळेंनी तेथून काढता पाय घेतला. पदयात्रेत 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिलांना केला. या प्रश्नावर वर्ध्यातील एका महिनेचा राग अनावर झाला.

महिला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संतापल्या. महिला विरोधात बोलू लागताच बावनकुळेनी माईक खाली सरकावला. या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. यावेळी बावनकुळेंची फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.

याआधीही झाली होती बावनकुळेंची फजिती

मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखाच जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री जनतेत मिसळून लोकसंपर्कातून मोदींचा प्रचार करत आहेत. त्यासाठी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत लोकांच्या मनातील भावना जाणून घेतल्या होत्या.

यावेळी एका तरुणाला बावनकुळेंनी 2024 च्या पंतप्रधानाबद्दलचा प्रश्न विचारला होता. त्यावर राहुल गांधी हे उत्तर दिल्याने प्रदेशाध्यक्षांची पंचायत झाली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात अशीच फजिती बावनकुळेंची झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी