उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक?, नेमकं काय घडलं?

मुंबई | बोल्ड कपडे घातल्यामुळे उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिस उर्फीला ताब्यात घेताना दिसत आहेत. उर्फी जावेदला तोकडे कपडे घातल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. उर्फी जावेदचा अटकेचा हा व्हिडीओ पापाराझी अकाउंट विरल भयानी व सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी शेअर केला आहे. (Urfi Javed arrested by the police?)

तुला जे बोलायचं आहे ते पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बोल, असं सांगत त्या दोन्ही महिला पोलिस तिला एका काळ्या कारमध्ये बसवतात आणि ते सर्व निघून जातात, असं त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हे फक्त नाटक आहे अशा कमेंट्स सोशल मीडियावर अनेक जण करत आहेत. युजर्सना हा उर्फीचा नवीन ड्रामा वाटत आहे. त्या पोलिसही बनावट आहेत, असंही अनेकांचं म्हणणं आहे.

छोटे कपडे घातल्याचं कारण सांगत त्या महिला पोलिसांनी तिला त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं. मात्र ही माझी मर्जी आहे, मी मला पाहिजे ते कपडे घालू शकते असं उर्फी म्हणते.

तुला जे बोलायचं आहे ते पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बोल, असं सांगत त्या दोन्ही महिला पोलिस तिला एका काळ्या कारमध्ये बसवतात आणि ते सर्व निघून जातात, असं त्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

उर्फीला खरंच तिच्या कपड्यांमुळे अटक झाली आहे की तो व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी बनवला गेलाय, याबाबत अधिकृत माहिती नाही. पण पापाराझी अकाउंटवरून उर्फीला खरंच अटक झाल्याचं म्हटलं गेलंय, पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

 

महत्त्वाच्या बातम्या- 

ललित पाटील प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती उघड!

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!

राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .