“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”

मुंबई | जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) जरांगेंना इशारा दिला होता. तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय बोलायचं बंद करा. तसेच तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर फडणवीसांवर आणि राजकीय बोलायचं थोडं बंद करा, असा सल्ला राणेंनी जरांगेंना दिला होता. यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

नितेश राणे यांच्या विधानामुळे मराठा आंदोलक अधिक भडकले. सांगलीत मराठा समाजाच्या आंदोलकांनी नितेश राणे यांना थेट आव्हान दिलं. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगलीमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं.

बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही. नितेश राणे यांची मराठा समाजात काय किंमत आहे ते गरजवंत मराठा समाजापुढे एकटे येऊन बघावं, असं थेट आव्हान सांगलीतील मराठा आंदोलकांनी नितेश राणे यांना दिलं.

आमदार नितेश राणें विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संतप्त मराठा समाजाकडून नितेश राणेंच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

काय म्हणाले होते नितेश राणे?

माझी किती किंमत आहे ना हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माहिती आहे. तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय बोलायचं बंद करा. तसेच तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर फडणवीसांवर आणि राजकीय बोलायचं थोडं बंद करा, असा सल्ला राणेंनी जरांगेंना दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक?, नेमकं काय घडलं?

ललित पाटील प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती उघड!

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!