मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

मुंबई | मराठा समाज (Maratha) कुणबी आहे की नाही? याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी सरकारने समिती बनवली आहे. न्यामूर्ती संदीप शिंदे (Sandip Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून सध्या मराठा समाजच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे.

शिंदे समितीच्या शोध मोहिमेत मराठवाड्यात आणखी 3500 नोंदी सापडल्याची माहिती आहे. मराठवाड्यात कुणबीच्या नोंदी 15 हजारावर पोहोचल्या आहेत. 25 हजारापर्यंत नोंदी सापडण्याचा शिंदे समितीला अंदाज आहे. 25 हजार नोंदीतून 25 लाख मराठा समाजाला प्रमाणपत्र देणं शक्य आहे.

शिंदे समितीची कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरूच आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राद्वारे आरक्षण द्यावं, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत

आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. कालच या आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतलं. त्यांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याचवेळी सरकारने 2 जानेवारीपर्यंत मुदत दिल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”

उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक?, नेमकं काय घडलं?

ललित पाटील प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती उघड!

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .