“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे वारंवार ठाकरे कुटुंबावर टीका करताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा नितेश राणेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्या टीका केली आहे. तसेच नितेश राणेंनी मोठा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

उद्धव ठाकरे कुटुंबासह डेहरादूनला गेल्याचं नितेश राणेंनी (Nitesh Rane) म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरेंना लवकरच अटक होणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे हे कुटुंबासह डेहराडूनला गेल्याचं म्हटलं आहे. ठाकरे कुटुंब खानसामासह काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झालं आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. फडणवीस पक्षासाठी गेले होते. कौटुंबिक सहलीसाठी नाही. तुम्ही फक्त कौटुंबीक सहलीसाठी गेला आहात, असा हल्ला नितेश राणे यांनी चढवला आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत, असा दावाही त्यांनी याआधी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”

उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक?, नेमकं काय घडलं?

ललित पाटील प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती उघड!

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले