मुंबई | मनोज जरांगे पाटलांनी ( Manoj jarange patil ) उपोषण स्थगित केले आहे. गेल्या काही दिवसांपासुन ते उपोषणाला बसले होते. या आगोदर त्यांच्या राज्यात जंगी सभा पार पडल्या. हजारोंच्या संख्यने मराठा बांधव त्यांच्या सभेला जमायची. त्यांची शेवटची सभा आंतरवाली सराटी ( Antravali sarati ) या त्यांच्या गावात पार पडली. सुमारे 170 एकर परिसरात ही सभा होती. या सभेसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या शेकऱ्यांसाठी राज्य सरकारने (State govrnment ) मोठा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटीत झालेल्या सभेसाठी शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करुन दिली होती. शेतकऱ्यांनी 170 एकर शेतीतील सोयबिन आणि कपाशी ही पिके उपटून फेकली होती. या सभेसाठी 441 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 32 लाख रुपायांची मदत मिळणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल.
मनोज जरांगे पाटलांनी काल तात्पुरतं उपोषण स्थगित केले आहे. उपोषण स्थगित करण्यासाठी त्यांनी काही अटी सरकार पुढे ठेवल्या होत्या. सभेला जागा उपलब्ध करुन देणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, ही एक अट होती. त्या अटीची राज्य सरकारने पुर्तता केली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले आहे. 2 जानेवारीपर्यंत हे उपोषण स्थगित केले आहे. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आणखी वेळ मागितला होता. त्या नंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्यत घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले
भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!