अजित पवार गटाविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी

नवी दिल्ली | खासदार सुप्रिया सुळे ( Supriya sule) अजित पवार गटाविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om birla) यांच्या पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अजित पवार गटात गेलेले रायगडचे खासदार सुनिल तटकरे  (Sunil tatkare) यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. अजित पवार  (Ajit pawar) यांच्या नेतृवात राष्ट्रवादीचा एक मोठा गट शिवसेना (शिंदे गट) (Shivsena) आणि भाजपसोबत (Bjp)  सत्तेत सहभागी झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या फळीतील नेते गेले. त्यावेळी सुनिल तटकरे देखील अजित पवार यांच्या गटात गेले.

राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातून लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, (Amol kolhe) श्रीनिवास पाटील (Shrinivas patil ) आणि सुनिल तटकरे हे चार खासदार आहेत. यांच्यापैकी सुनिल तटकरे हे अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांकडे केच्याली आहे.

सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या घटनांची आणि नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यांनी दहाव्या परिशिष्टानुसार पक्षविरोधी  कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ दहाव्या परिशिष्टानुसार कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्यामुळे ओम बिर्ला या पत्रावर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, यापुर्वी दाखल केलेल्या याचिकेचाही उल्लेख सुप्रिया सुळे यांनी या पत्रात केला आहे. 4 जुलैला सुप्रिया सुळे यांनी सुनिल तटकरेंना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्या याचिकेवर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आम्ही सुनिल तटकरे यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्या याचिकेवर काहीच निर्यय झाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

महात्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात ‘या’ पक्षातील नेत्याचा हात?

“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”

उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक?, नेमकं काय घडलं?