मुंबई | खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना पत्र लिहिलं आहे. खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे.
चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली. कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब सुप्रिया सुळेंकडून नमूद करण्यात आली आहे. यावर सुनिल तटकरेंनी सुप्रिया सुळेंना उत्तर दिलं. तसेच यावेळी बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केलाय.
अमोल कोल्हे अजित पवार गटात?
पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक त्यांनी दिल्याची माहितीही तटकरेंनी दिली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
सुनिल तटकरेंच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अमोल कोल्हेंनी अजित पवारांनी समर्थन दिल्याचं तटकरेंनी सांगितलंय. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अमोल कोल्हेंनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
तटकरेंच्या दाव्यानंतर खासदार अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात आहे, असा प्रश्न सर्वांना पडलाय. खरंच असं असेल तर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे. अमोल कोल्हेंमुळे अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा
खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले
भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!