सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून (ICC  Cricket World Cup 2023) क्रिकेट (Cricket)  चाहत्यांसाठी मोठी धक्का देणारी बातमी समोर येत आहे.  भारतीय संघाचा (Team india) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya) विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पुढील कोणतेच सामने हार्दिक पंड्या खेळू शकणार नाही.

भारतीय संघाच्या पुढील होणाऱ्या सामन्यांना हार्दिक पंड्या मुकला आहे. दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची (Prasiddha krishna ) संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पंड्या उपांत्य फेरीत पुनारगमन करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र त्याआधीच हार्दिक पंड्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. चालू सामन्यातून त्याला बाहेर पडावं लागलं होतं.  त्यानंतर झालेल्या न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांनमध्ये तो खेळू शकला नाही.

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. संघाने उपांत्य फेरीत मजल मारली आहे. त्यात हार्दिक पंड्याचा मोठा वाटा राहिला आहे. मात्र आता संघाला उर्वरित सामने पंड्या शिवाय खेळावं लागणार आहेत.

भारतीय संघाने गेल्या सामन्यात बांग्लादेशला हरवत, उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दमरार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र  त्यापुर्वीच हार्दिक पंड्यला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!

राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन