महाराष्ट्रात खळबळ! सर्वात मोठं लाचेचं प्रकरण समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | महाराष्ट्रातील सर्वात मोठं लाचेचं प्रकरण (Bribe Case) समोर आलं आहे. राज्यात भ्रष्टाचार विरोधी जनजागृती दक्षता सप्ताह सुरु आहे. त्याचवेळी अहमदनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा सर्वात मोठी कारवाई झाली. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक कोटींची लाच मागणारा सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारी या प्रकरणाची माहिती दिली. हा प्रकार कसा घडला? यासंदर्भात सविस्तर माहिती त्यांनी दिली. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजलीये.

नेमकं प्रकरण काय?

MIDC चे सहाय्यक अभियंता असलेल्या अमित गायकवाड याने एका शासकीय ठेकेदारास 1000 mm व्यासाच्या पाईपलाईनचे काम दिले होते. हे काम करून दिले त्याचे बक्षीस म्हणून 1 कोटी रुपयांची मागणी केली होती.

या सर्व प्रकरणात धुळे येथील गणेश वाघ याचा रोल निष्पन्न झाला आहे. त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. लाचेच्या या प्रकरणात अमित गायकवाड सोबत गणेश वाघ यालाही आरोपी करण्यात आले आहे.

लाच घेणार आणि लाच देणारा यांचामधील संभाषण समोर आलं आहे. त्यात तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळालं आहे, असं म्हटलं गेलं आहे. या प्रकरणात अभियंत्यासह आणखी एका व्यक्तीचा महत्वाचा रोल असल्याचं समोर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!