सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

जालना | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं होतं. गेले आठ ते नऊ दिवस जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कसलाच विचार न करता उपोषण केलं.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यावर त्यांना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र अजून सुद्धा मराठा आरक्षणावर अनेक बैठकी चालू आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतचा नवीन जीआर घेऊन राज्य सरकारचं शिष्ठमंडळ आज मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे सर्व आज जालना येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नवा जीआरबाबात भेटण्यास गेले आहेत.

जरांगेंना जीआर सुपूर्द

मनोज जरांगे यांना भेटल्यानंतर संदिपान भुमरे म्हणाले की, हा जीआर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठीचा आहे. हा जीआर पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. पहिल्यांदा मराठवाड्यासाठी होता मात्र, आता लवकरात लवकर समिती काम करेल, असं भुमरे म्हणाले.

सरकारला जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ते 2 जानेवारीचा वेळ दिला आहे. यावर देखीव भुमरे यांनी भाष्य केलं ते म्हणाले की, मला वाटतं की त्यात्या आतपण समितीचं काम पूर्ण होऊ शकतं. 5-6 दिवसाचा फार मोठा विषय नाही. एखादा दिवस आधी किंवा एखादा दिवस नंतरही होऊ शकतं. समाज बांधवांना कसा न्याय देता येईल हे पाहायचं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!