महत्त्वाची बातमीः मनोज जरांगे यांच्या तब्येतीबद्दल चिंताजनक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आधी 14 दिवस उपोषण केलं होतं. त्यानंतर सरकार आरक्षणावर कोणताच निर्णय घेत नाही म्हणून जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं होतं.

अनेक नेते मंडळी यांनी सांगून देखील जरांगे यांनी माघार घेतली नाही. त्यानंतर गेले आठ ते नव दिवस जरांगे यांनी अऩ्न पाण्याला हात लावला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला आहे.

जरांगेंच्या प्रकृतीवर काय परिणाम झाला?

उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती, ते अशक्त झाले होते. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. नऊ दिवस उपोषण केल्यानं जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांचे जवळपास 12 किलो वजन घटले आहे.

जरांगेंच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी पुढील 10 ते 12 दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काही दिवस त्यांनी पाणी न प्यायल्याने प्रकृती खालावली आहे, असंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. सतत सुरू असलेले दौरे आणि उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

मनोज जरांगे हे उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असून, त्यांना आणखी 15 दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. सध्या जरांगे यांना शारीरिक हालचाल करण्यास मर्यादा आहेत. राज्यभरातील दौरे आणि उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!