‘अजित पवारांमुळेच…’; मीरा बोरवणकरांचा नवीन आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांनी पुस्तकात केलेल्या टीकेवरुन चांगलीच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणखी एक मोठा आरोप केलाय. अजित पवार यांच्या दबावामुळे पुण्यातील कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा दावा मीरा बोरवणकर यांनी केलाय.

मीरा बोरवणकरांचा नवा आरोप?

माझ्या ‘मॅडम कमिश्नर’ पुस्तकाचा 25 नोव्हेंबरला चंदिगडमध्ये वाचनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर मला 26 नोव्हेंबरला पुण्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यांनी मला निमंत्रण दिल्यानंतर तीन-चार दिवसांनी फोन केला. आयोजकांनी कारण सांगताना त्या लेखिकेलाच पुढे केलं. आम्ही दोन-तीन दिवसांपासून विचार करत होतो की आपल्याला कसं सांगावं. आता आपल्याला हा कार्यक्रम घेता येणार नाही. कारण अजित दादा यांच्याशी संबंध जे सगळं प्रकरण झालंय. मला एकदम धक्का बसला. मला माहिती आहे की, काही ना काही असा प्रतिसाद असणार, कारण मी राजकीय नेत्याबद्दल बोलले, असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं.

मी त्यांना एक लेखी मेसेज पाठवला की, ज्यांनी मला एअर तिकीट पाठवलं होतं, माझा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. तुम्ही एकदा क्लेरिफाय करताय का? त्यांनी मला चार-पाच तासांनी मला उत्तर दिलं की, तुमचं सेशन ओव्हरलॅपिंग, ते रद्द करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

तुमचं विमान तिकीटही रद्द करण्यात आलंय. हा त्याचाच परिणाम असेल. अजित दादांना अधिकारी घाबरतातच, पण मीडिया सुद्धा घाबरते, असं सांगत मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर नवा आरोप केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय 

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!