Instagram l आजकाल सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणे देखील जास्त प्रमाणात वाढले आहे. अशातच तरुणवर्ग इंस्टाग्रामचा वापर जास्त प्रमाणात करतात. जर तुम्ही देखील इंस्टाग्रामचा वापर फक्त मनोरंजनासाठी करत असाल तर तुमचे स्वतःचे मोठे नुकसान होत आहे. कारण इंस्टाग्राम रीलमधून इन्फ्युएंसर जास्त प्रमाणात पैसे कमवतात. मात्र ते किती पैसे कमवतात हे आज आपण जाणून घेऊयात…
इंस्टाग्राम इन्फ्ल्युएंसर कमवतात भरमसाठ पैसा :
इन्फ्ल्युएंसर म्हणजेच रिल्स स्टार त्यांच्या रिल्सवर येणारे व्ह्युजवरुन भरमसाठ पैसा कमावतात. मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की? किती व्ह्युजवर त्यांना किती पैसे मिळतात. तर एका व्हिडीओवर 1 मिलियन व्ह्युज आले तर त्या रिल्सस्टारला 40 हजार ते 8 लाखांपर्यंत पैसे मिळू शकतात.
याशिवाय रिल्समधून अनेक वेगवेगळ्या प्रकारे देखील कमाई केली जाते. त्यामुळे प्रत्येकाची कमाई ही नक्कीच वेगळी असते. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे फॉलोवर्स, व्ह्युज, पार्टनरशीप आणि एंगेजमेंट या विविध गोष्टींनुसार रिलवर कमाई केली जाते.
Instagram l अशाप्रकारे कमी करतात? :
जर एखादा इन्फ्ल्युएंसर nano कॅटेगरीतील असेल तर तो त्याच्या अकाउंटवरील एका पोस्टचे 3 हजार ते 4 हजार रुपये कमावतो. तसेच जर एखादा इन्फ्ल्युएंसर हा micro कॅटेगरीतील असेल तो पोस्टद्वारे 40 ते 60 हजारांपर्यंत कमाई करतात. याशिवाय macro कॅटेगरीतील इन्फ्ल्युएंसर प्रति पोस्ट 1.5 ते 3.5 लाख रुपये अगदी सहज कमावतात. तसेच जर एखादा इन्फ्ल्युएंसर mega कॅटेगरीतील असेल तर तो प्रति पोस्ट 4 लाख रुपये कमावतो.
त्यामुळे आजकाल तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात इंस्टग्राम या सोशल मीडिया अँपचा सर्वात जास्त वापर करताना दिसत आहेत. तसेच तुम्हाला देखील इंस्टग्रामवर वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही घरबसल्या इन्स्टाग्रामवर लाखो रुपये कमवू शकता.
News Title : How Much Money Do Reels Stars Make Monthly?
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यानी केला उद्धव ठाकरे गटात प्रवेश
विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ‘छावा’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे फोटो व्हायरल
अप्पी आमची कलेक्टर मालिकेला धक्कादायक वळण, अर्जुनला सोडून जाणार अप्पी?
दुबईत संगीत सेरेमनी तर लंडनमध्ये सातफेरे, ‘असा’ होणार राधिका-अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा
शुभमन गिल सारासोबत ब्रेकअप करून ‘या’ तरुणीच्या प्रेमात दंग