अप्पी आमची कलेक्टर मालिकेला धक्कादायक वळण, अर्जुनला सोडून जाणार अप्पी?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Appi Amchi Collector | अप्पी आमची कलेक्टर (Appi Amchi Collector) ही मालिका खेड्यापासून शहरात लोकप्रिय आहे. या मालिकेचा चाहता वर्गही आहे. ही मालिका प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करते. प्रेक्षकांना मालिकेबाबत विचार करायला भाग पाडते. अप्पी आमची कलेक्टर (Appi Amchi Collector) ही देखील अशीच एक मालिका आहे. सध्या तिची जोरदार चर्चा आहे. अप्पी आणि अर्जुनच्या जीवनात अनेक संकटं आली आहेत. याआधी अप्पी आणि अर्जुन यांच्या मुलाचा जन्म झाला ते मुल अदलाबदली झालं. त्यानंतर ते मुलं भेटलं मात्र आता नवीन संकट अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात आलंय. (Appi Amchi Collector)

अप्पीची उत्तराखंडमध्ये बदली

नुकतीच अप्पीची उत्तराखंडमध्ये बदली झाली आहे. यामुळे आता अर्जुन अप्पीसोबत उत्तराखंडला जाणार की घरीच थांबणार हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे. अप्पीच्या बदलीमुळे अर्जुनकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे अर्जुनने काम धंदा सर्वकाही सोडून अप्पीसोबत जाणे किंवा इकडेच राहणं या दोन पर्यायांपैकी अर्जुन एक वाट निवडतो. (Appi Amchi Collector)

अर्जुन अप्पीसोबत उत्तराखंडला जाणं टाळून तो घरीच थांबतो. अप्पीने आईबद्दल गोष्टी लपवल्याने तो इकडंच थांबण्याचा निर्णय घेतो आणि तो त्या निर्णयावर ठाम असतो. दरम्यान मालिकेला एका वेगळ्या कारणाने वळण प्राप्त झालं आहे.

अर्जुन अप्पीला अमोलला त्याचे बाबा हरवल्याचं कारण सांगायाला लावतो. जेनेकरून तो अप्पीला आई आणि बाबा मानून आपलं जीवन जगेल. जसे की अर्जुनची आई गेल्यानंतर तो विनायकला आपले आई-बाबा मानून जगायला शिकत होता. अप्पीपुढेही काही पर्याय नसल्याने अप्पी अमोलला घेऊन उत्तराखंडला घेऊन निघून जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेत ट्विस्ट

सुजय आणि पियुमुळे सराकरचं लपलेलं सत्य उघडकीस येतं. सरकारांनी पैशाच्या लोभापायी अर्जुनच्या आईची हॉस्पिटलचे उपचार पूर्ण होऊन दिले नाहीत. हे ऐकून अर्जुन आणि विनायकच्या पायाखालची जमीन सरकते. सरकार त्याची चुक मान्य करतो. तेव्हा अर्जुन, विनायक अप्पी आणि अमोलसोबत घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. तेव्हा सुजय हे सत्य असल्याचं अप्पीला सांगतो. हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो, असं मालिकेत दाखवण्यात आलंय.

अप्पीलाही हे सर्व सत्य माहिती असतं. मात्र अप्पीला अमोलचा जन्म आणि त्याची अदलाबदली हे सर्व सांगून तिला त्रास होतो. हे सत्य अप्पीने अर्जुनपासून लपवल्याने अर्जुन अप्पीवर चिढतो.

News Title – Appi Amchi Collector Marathi Serial Twist

महत्त्वाच्या बातम्या

शाळा 9 वाजल्यानंतर भरणार का?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

बाप लेक एकाच चित्रपटात, लेकीचं करिअर घडवण्यासाठी शाहरूखने उचललं मोठं पाऊल

“रोहित शर्मा तरी कुठे…”, ‘या’ माजी खेळाडूकडून पांड्याची पाठराखण

आधी बिनशर्त पाठिंबा, आता मनसेनं वाढवल्या एकनाथ शिंदेंच्या अडचणी!

“चहलने माझा नवरा चोरला”, रोहित शर्माच्या पत्नीच्या आरोपांची एकच चर्चा