“एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) सडकून टीका केली आहे. पवार साहेब जर तुमची जात वेगळी असती ! तुमचेही आडनाव फडणवीस असतं तर तुम्हालाही कोणी हुंगलं नसतं, अशा सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीये. एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला, म्हणून पवारांना खोटे बोलून रेटून चालावं लागत आहे, असंही खोत म्हणाले.

सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका

सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून हल्लाबोल केलाय. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांना बाप म्हणते ते पवारांना पुरून उरल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात मूठभर सरदारांचे राजे होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवणारे देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील आघाडी सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता उलथवून टाकली. त्यामुळेच शरद पवार यांना फडणवीस यांची जात काढावी लागली, असा आरोप त्यांनी केला आहे.

27 एप्रिल ला कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. पुन्हा एकदा ही जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीमागे उभी राहील. ही लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया मध्ये असणारे नेते हे सर्व लुटारू आणि अलीबाबाचे साथीदार आहेत, अशी टीका त्यांनी केलीये.

पंतप्रधान मोदी हे भारतातील अठरापगड जातीला सोबत घेऊन जातात , त्यामुळे इंडिया आघाडीच्या लुटारूंना महायुती मूठ माती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर देखील वाड्यांच्या विरोधात लढले होते. महायुतीच्या माध्यमातून हे वाडे उध्वस्त होतील, महायुतीचा विजय या ठिकाणी नक्की होणार, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

ग्राहकांना फटका! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; RBI ने घातली बंदी

‘मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर खाडाखोड करून गद्दारांचं नाव लिहीलं’

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यानी केला उद्धव ठाकरे गटात प्रवेश

विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ‘छावा’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे फोटो व्हायरल

अप्पी आमची कलेक्टर मालिकेला धक्कादायक वळण, अर्जुनला सोडून जाणार अप्पी?