ग्राहकांना फटका! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; RBI ने घातली बंदी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RBI | देशातील सर्वोच्च बँक आरबीआयने एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.परिणामी, या बँकेत ज्या ग्राहकांचे खाते असेल त्यांना त्यातून पैसे काढता येणार नाहीत. नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँकेकडून नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यात आता अजून एका बँकेचा समावेश झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध घातले आहेत.

‘या’ बँकेवर RBI ची कारवाई

बँकेची स्थिती चांगली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.त्यामुळे आर्थिक निकषवर ही बंदी घालण्यात आली आहे. याचा ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो.कारण, त्यांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत.

सध्याची स्थिती पाहता या बँकेतून कोणतेही व्यवहार ग्राहकांना करता येणार नाहीत. यासोबतच या बँकेतून तूर्तास तरी पैसे काढता येणार नाहीत असे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच बँकेत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक होणार नाही.मात्र,ग्राहकांना लोन काढता येऊ शकतं.

ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

आरबीआयने (RBI ) या बँकेतील सर्व बचत खाती आणि चालू खात्यांमधील ठेवी काढण्यास आणि इतर खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित करण्यास बंदी घातली आहे. आता प्रश्न पडतो की, ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?, तर,ग्राहक डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून त्यांच्या ठेव रकमेच्या 5 लाखांपर्यंतच्या विम्याचा दावा करू शकतात, असे RBI ने म्हटले आहे. ग्राहकाला ठेवीवर विमा दावा करण्याचा अधिकार आहे.

आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, कर्जदारांवर बंदी म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग ऑपरेशन्स सुरू ठेवेल असे त्यात म्हटले आहे.

News Title : RBI bans Konark Urban Cooperative Bank

महत्त्वाच्या बातम्या-

‘मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर खाडाखोड करून गद्दारांचं नाव लिहीलं’

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यानी केला उद्धव ठाकरे गटात प्रवेश

विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ‘छावा’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे फोटो व्हायरल

अप्पी आमची कलेक्टर मालिकेला धक्कादायक वळण, अर्जुनला सोडून जाणार अप्पी?

दुबईत संगीत सेरेमनी तर लंडनमध्ये सातफेरे, ‘असा’ होणार राधिका-अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा