Sanju Samson | संजू सॅमसननं करुन दाखवलं… खूप दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं केलं सोनं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanju Samson | भारतीय क्रिकेट संघाची सध्या दक्षिण आफ्रिकेसोबत एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू संजू सॅमसनने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं पहायला मिळालं. भारतीय संघ अडचणीत असताना संघाला सावरण्याचं काम संजू सॅमसनने केलं.

संजू सॅमसनची शतकी खेळी-

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या ठराविक अंतराने विकेट पडत होत्या, त्यावेळी एका बाजूने भारतीय संघाचा किल्ला लढवण्याचं काम संजू सॅमसनने केलं.

गरज असताना भारतीय संघाला मदत करण्यासोबत संजू सॅमसनने (Sanju Samson) शतकी खेळी सुद्धा केली, वनडे सामन्यांमधील संजूचं हे पहिलंच शतक आहे, त्यामुळे संजू सॅमसनच्या या खेळीचं कौतुक होताना पहायला मिळत आहे.

संजूने आपल्या खेळीत 114 चेंडूंमध्ये 108 धावांची खेळी केली, त्याच्या या खेळीत 3 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकांमध्ये मात्र त्याला आपली विकेट टिकवता आली नाही, मात्र त्याची ही खेळी भारतासाठी खास ठरली.

दरम्यान, पहिल्या सामन्यात संजूला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली मात्र फार चमकदार कामगिरी करता आली नाही. या सामन्यात मात्र दोन्ही सलामीवीर आणि कर्णधार केएल राहुल बाद झाल्यानंतर तिलक वर्माच्या साथीने संजूने भारताचा डाव सावरला.

संजू सॅमसन गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये (IPL 2024) राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्त्व करत आहे. त्याला भारतीय संघात संधी देण्याची मागणी होत होती. अखेर यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली आणि त्याने कारकिर्दीतलं पहिलं वनडे शतक ठोकलं.

News Title: INDvsSA Sanju Samson Century against South Africa

महत्त्वाच्या बातम्या-

‘MS Dhoni नं ‘भारताच्या कायरन पोलार्ड’ला दिला होता शब्द; “कोणीच खरेदी केलं नाही, तर मी तुला खरेदी करणार!”

ऐश्वर्या-अभिषेकनंतर आता Ajay Devgn-Kajol च्या नात्यात दुरावा; ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Corona JN1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणं कोणती?, प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Shreyas Talpade | तब्येतीबाबत स्वतः श्रेयसने दिली मोठी माहिती

Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण