‘MS Dhoni नं ‘भारताच्या कायरन पोलार्ड’ला दिला होता शब्द; “कोणीच खरेदी केलं नाही, तर मी तुला खरेदी करणार!”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | IPL Auction 2024 मध्ये कित्येक अनकॅप्ड खेळाडूंचं भाग्य फळफळलेलं पहायला मिळालं. यामध्ये झारखंडच्या अवघ्या 21 वर्षांच्या रॉबिन मिंजचा देखील समावेश होता. रॉबिन मिंज (robin minz) हा विकेटकीपर आणि फलंदाज आहे आणि त्याला भारताचा कायरन पोलार्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं.

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात रॉबिन मिंजला गुजरात टायटन्स संघाने खरेदी केलं. 20 लाख बेस प्राईज असलेल्या रॉबिनला मिळालेली किंमत ऐकाल तर तुम्ही देखील थक्क व्हाल… कारण या लिलावात रॉबिन चक्क करोडपती झाला आहे. त्याच्यावर एक दोन कोटी नव्हे तर चक्क 3 कोटी 60 लाख रुपयांची बोली लागली आहे. या बोलीची आता एकच चर्चा क्रिकेटच्या वर्तुळात होताना पहायला मिळत आहे.

लिलावात रॉबिनची हवा-

रॉबिन मिंज हा झारखंडचा युवा खेळाडू आहे. भारताचा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) त्याचा आदर्श आहे. धोनीच्याच पावलावर पाऊल टाकत रॉबिन फलंदाजीसोबत एक उत्कृष्ठ विकेटकीपर सुद्धा आहे. त्यामुळे एक विकेटकीपर त्यासोबत फलंदाज असा दुहेरी फायदा असल्यानं आणि वय सुद्धा कमी असल्यानं अनेक फ्रँचाईसींनी त्यावर बोली लावली होती, मात्र गुजरात टायटन्सनं या लिलावात बाजी मारली.

धोनीनं केला होता खरेदी करण्याचा वादा-

रॉबिनचे वडील फ्रान्सिस झेवियर मिंज सैन्यातून निवृत्त झाले असून ते सध्या रांची विमानतळावर सेक्युरिटी गार्डचं काम करत आहेत. त्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना एक मोठा खुलासा केला आहे. विमानतळावर धोनीची आणि माझी भेट झाली होती, त्यावेळी धोनीने माझ्यासोबत एक वादा केला होता, असा दावा त्यांनी केला आहे.

“धोनीची आणि माझी विमानतळावरच काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. यावेळी धोनीने मला शब्द दिला होता की आयपीएलच्या (IPL Auction 2024) लिलावात जर कुणीच रॉबिनला घेतलं नाही तर चेन्नई सुपर किंग्स त्याला विकत घेईल.”, असं फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे. फ्रान्सिस यांना धोनीने दिलेला शब्द पाळण्याची वेळच आली नाही कारण गुजरातने रॉबिन्सला त्याच्या बेस प्राईजपेक्षा कितीतरी मोठी रक्कम देऊन खरेदी केलं. मात्र या निमित्ताने धोनीची मन किती मोठं आहे याची चर्चा रंगली आहे.

भारताचा कायरन पोलार्ड का म्हटलं जातं?

रॉबिन आता गुजरात टायटन्स संघाचा भाग झाला आहे, संघात स्थान मिळवण्यासाठी त्याची लढाई भारताचा विकेटकीपर वृद्धिमान साहा याच्यासोबत आहे. येत्या आयपीएलमध्ये तो फक्त बाकावरच बसलेला दिसणार तर त्याला संघात देखील स्थान मिळेल, असं सांगितलं जातंय. दरम्यान, रॉबिनला भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने ‘भारताचा उजव्या हाताने फलंदाजी करणारा कायरन पोलार्ड’ म्हटलं होतं, तेव्हारपासून त्याला भारताचा पोलार्ड म्हणून ओळखलं जातंय.

News Title: ms dhoni want to purchase robin minz

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या-अभिषेकनंतर आता Ajay Devgn-Kajol च्या नात्यात दुरावा; ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Corona JN1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणं कोणती?, प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Shreyas Talpade | तब्येतीबाबत स्वतः श्रेयसने दिली मोठी माहिती

Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण

CoronaVirus | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी घाबरु नका!, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती