Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Corona JN1 | तीन वर्षांपूर्वीत भारतासह जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. अशात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात एंट्री केलीये. Corona JN1 या नव्या विषाणूचा रुग्ण सिंधुदुर्गात आढळला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला Corona JN1 चा रूग्ण

Corona JN1 रूग्ण सिंधुदुर्गात आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे नागरिक सतर्क झाले आहेत. तसेच हा रुग्ण पूर्णपणे बरा असून कुणी घाबरून जाऊ नये, असं आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोना रूग्णाची वाढती आकडेवारी पाहता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 इतकी आहे. त्यामध्ये मुंबईतील 27, ठाणे 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्ण यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या जेएन 1 विषाणूचा रुग्ण सापडल्याने पुणे महापालिका अलर्ट मोडवर गेली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरात कोविड चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच पूर्वतयारी म्हणून महापालिका रुग्णालयात करण्यात मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी पालिका रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधसाठ्याचा आढावा घेण्यात आला.

Corona JN1 | आरोग्य विभागाकडून महत्त्वाचं आवाहन

देशभरात आणि महाराष्ट्रातही सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केलं आहे. राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असले तर दक्षता घ्यावी, मात्र घाबरून जाण्याची गरज नसल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

लोकांनी बाहेर पडताना, मास्क घालावं, सोशल डिस्टन्सचं पालन करावं आणि वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी अशा सूचनाही आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

CoronaVirus | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी घाबरु नका!, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Aishwarya Rai च्या नात्याबद्दल मोठा गैप्यस्फोट!

Crime | पूजाच्या सांगण्यावरुन ‘तो’ व्हिडीओ कॉलवर न्यूड झाला अन्…, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Corona Update| पुन्हा कोरोनाचा धोका; डॉ. तात्याराव लहानेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Weather Update | महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा गारठला, आणखी थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा