CoronaVirus | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी घाबरु नका!, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CoronaVirus | कोरोनाचा नवा JN1 Varient देशभरात आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केरळमध्ये या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशभरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. देशभरातील यंत्रणांनी या व्हेरियंटला तोंड देण्यासाठी कंबर कसली आहे.

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबद्दल रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता तज्ज्ञांनी देखील एक महत्त्वाची माहिती दिली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवात जीव आला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे तज्ज्ञांनी?

कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर देशभरात हाहाकार उडाला होता, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या व्हेरियंटचे रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील पहिला रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली, त्यानंतर राज्याच्या इतर भागातही या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याचं समोर येत आहे.

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, मात्र या व्हेरियंटची लागण झाली तरी अजिबात घाबरु नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असला तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. या आजाराचा रुग्ण एका आठवड्यात बरा होतो, त्यामुळे घाबरुन जाऊ नये, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

नेमका काय सल्ला दिलाय तज्ज्ञांनी?

पुण्यात आतापर्यंत जेएन-वन विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा विषाणू वेगाने पसरत असला तरी त्याची लक्षणं सौम्य स्वरूपाची आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलंय. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र असं असलं तरी विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. -डॉ. राजेश कार्यकर्ते, राज्य समन्वयक, जीनोम सिक्वेंन्सिंग 

JN1 विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. JN1 विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं आपल्या हातात आहे, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. -तानाजी सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

News Title: Experts opinion on CoronaVirus JN1 Varient

महत्त्वाच्या बातम्या-

Aishwarya Rai च्या नात्याबद्दल मोठा गैप्यस्फोट!

Crime | पूजाच्या सांगण्यावरुन ‘तो’ व्हिडीओ कॉलवर न्यूड झाला अन्…, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Corona Update| पुन्हा कोरोनाचा धोका; डॉ. तात्याराव लहानेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Weather Update | महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा गारठला, आणखी थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा

Corona Virus Update | पुन्हा धोका वाढला, महाराष्ट्रानं सुरु केली ‘ही’ महत्त्वाची तयारी!