Shreyas Talpade | तब्येतीबाबत स्वतः श्रेयसने दिली मोठी माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shreyas Talpade | मराठी सिनेसृष्टीत चाॅकलेटबाॅय म्हणून ओळखला जाणारा श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील कलाकरांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, त्याचदिवशी उशीरा श्रेयसवर (Shreyas Talpade) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. उपाचारासाठी त्याला काही दिवस अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर श्रेयसने त्याच्या तब्येतीबाबत स्वतः अपडेट दिली आहे.

काय म्हणाला श्रेयस?

माध्यमांशी बोलत असताना श्रेयसने (Shreyas Talpade) आपल्या प्रकृतीबद्दल स्वतः माहिती दिली. शिवाय श्रेयसचे चाहते त्याची काळजी करत होते म्हणून त्यांच्यासाठी श्रेयसने आभार व्यक्त केले.

श्रेयस म्हणाला की, ‘तुमच्या पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार. मी आता थोडा बरा आहे.’ दरम्यान, बोलत असताना श्रेयसला डिस्चार्जबाबत देखील विचारण्यात आलं. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘डिस्चार्ज मिळालेला नाही. मी अजूनही रुग्णालयातच आहे.’

Shreyas Talpade ला डिस्चार्ज मिळणार?

श्रेयसवर अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात ठेवलं होतं. त्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्याचा मित्र आणि चित्रपट निर्माता सोहम शाहने दिली होती. पण अद्याप श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दिप्ती तळपदेनी आभार मानले-

श्रेयसची बायको दिप्तीने देखील सर्वांचे आभार मानत पोस्ट शेअर केली आहे. दिप्ती म्हणाली की, “या शहरातील काही चांगल्या व्यक्तींचे मी आभार मानू इच्छिते. त्या संध्याकाळी मी मदतीसाठी हाक मारताच 10 जण माझ्या मदतीला धावून आले.”

News Title : shreyas talpade gives his health update

थोडक्यात बातम्या-

Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण

CoronaVirus | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी घाबरु नका!, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Aishwarya Rai च्या नात्याबद्दल मोठा गैप्यस्फोट!

Crime | पूजाच्या सांगण्यावरुन ‘तो’ व्हिडीओ कॉलवर न्यूड झाला अन्…, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Corona Update| पुन्हा कोरोनाचा धोका; डॉ. तात्याराव लहानेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती