ऐश्वर्या-अभिषेकनंतर आता Ajay Devgn-Kajol च्या नात्यात दुरावा; ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्याकाही दिवसांपासून अभिनेत्री Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन हे दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दोघंही विभक्त होणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण हे बघायला मिळतंय. अशात ऐश्वर्या-अभिषेकनंतर आता अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणच्या (Ajay Devgn) नात्यात दुरावा आला असल्याचं बोललं जात आहे.

Ajay Devgn-Kajol च्या नात्यात दुरावा

करण जोहरच्या कॉफी विथ करण 8 या शोच्या पुढच्या आगामी एपिसोडमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी दिसणार आहेत. शोच्या प्रोमोमध्ये दोघेही करणच्या प्रश्नांना मजेशीर पद्धतीने उत्तर देताना दिसत आहेत. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अजय देवगणन असं काही बोलून गेला ज्यामुळे त्याच्या आणि काजोलच्या घटस्फोटाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

Ajay Devgn काय म्हणाला?

रॅपिड-फायर सेगमेंट दरम्यान, करण जोहरने अजय देवगनला विचारलं की त्याला इंडस्ट्रीतील या अभिनेत्यांकडून काय चोरायचं आहे. सर्वात आधी करण जोहरने सलमान खानचं नाव घेतलं.

ज्याला अजय देवगणने उत्तर दिलं सिंगल स्टेटस. तर शाहरुख आणि अक्षय कुमारच्या नावावर अजय देवगण म्हणाला, ‘शाहरुखचा व्यवसाय आणि अक्षयचा 8 तासांच्या शिफ्टचं कॉन्ट्रॅक्ट’.

अजयने यावेळी सिंगल राहायची इच्छा व्यक्त केल्याने त्याच्या आणि काजोलमध्ये सर्वकाही ठिक आहे की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. तसेच अजय देवगण याने केलेलं वक्तव्य ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचं बघायला मिळत आहेत.

अजय देवगण याने थेट म्हटलंय की, सिंगल राहणं कधीही चांगलं. आता अजय देवगण याच्या याच वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. अजय देवगण याचं हे वक्तव्य ऐकून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजय देवगण आणि काजोलच्या लग्नाला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडींपैकी एक मानली जाते. मात्र आता अजय देवगण आणि काजोल हे विभक्त होणार आहेत असं बोललं जातंय. मात्र, यावर काजोलने काहीच भाष्य केलं नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

Corona JN1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणं कोणती?, प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Shreyas Talpade | तब्येतीबाबत स्वतः श्रेयसने दिली मोठी माहिती

Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण

CoronaVirus | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी घाबरु नका!, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Aishwarya Rai च्या नात्याबद्दल मोठा गैप्यस्फोट!